प्रमोद महाजनांचे पंख कापण्याची तयारी लालकृष्ण अडवानींनी केली तेव्हा
त्यांची पहिली खेळी संघप्रिय नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद
देणे ही होती. ती करताना त्यांनी प्रमोद महाजन यांना विश्वासात घेतले नव्हते.
संघाच्या मंडळींचा महाजनांवरील रोष वापरुन घेत त्यांच्या सहानुमतीने त्यांनी
गडकरींना प्रदेशाध्यक्षपदावर बसविले. ज्या दिवशी (नोव्हेंबर 2004) तशी घोषणा
भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने केली त्या दिवशी मी दिल्लीत महाजनांसोबत त्यांच्या
घरी होतो. महाराष्ट्राचे प्रभारी पद त्यांच्याकडे असतानाही त्या घोषणेच्यावेळी ते
पक्ष कार्यालयाकडे फिरकले नव्हते... `मला हा निर्णय आवडणारा नसल्यामुळे मी तेथे
जाणार नाही' हे त्यांनीच मला त्या वेळी सांगितले होते.
Tuesday, August 19, 2014
Sunday, August 17, 2014
ईश्वरइच्छेचा अवमान
बेंजामिन फ्रँकलिनने जेव्हा इमारतींवर वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी
विद्युत अवरोधकाचा (lightening rod) शोध लावला, तेव्हा इंग्लंड आणि अमेरिकेतील धर्मगुरुंनी त्याचा धिक्कार
केला. त्यांचे असे म्हणणे होते, की हा शोध म्हणजे ईश्वरी इच्छेचा अवमान करण्याचा
गर्हणीय प्रयत्न होय! या धर्मगुरुंना राजा तिसरा जॉर्जची अगदी सक्रीय
फूस होती. त्या काळच्या सर्व `विचारी, सुसंस्कृत’ लोकांना ठाऊक होते, की वीज पडणे ही ईश्वरइच्छेचा अवमान किंवा तत्सम
महाभयंकर पापकृत्य केल्याबद्दल ईश्वरानेच दिलेली शिक्षा असते. त्यामुळे एखाद्याला
विजेचा झटका द्यावा, अशी जर परमेश्वराचीच इच्छा असेल, तर बेंजामिन फ्रँकलिनने
ईश्वराचा बेत उधलून लावणे बरोबर नाही. कारण तसे करणे म्हणजे गुन्हेगाराला स्वतःचा बचाव करण्यास मदत करणे होय.
Thursday, August 14, 2014
मराठा सैनिक
शिवसेनेने 1969 मध्ये दाक्षिणात्यांविरुद्ध जोरदार
आंदोलन सुरू केलं होतं. उठाव लुंगी बजाव पुंगी अशी घोषणा दिली होती. डॉ. हेमचंद्र
गुप्ते, मनोहर जोशी आदी मध्य मुंबईतले नेते त्या काळी सर्व भागात फिरत होते. जमाव
पिसाटला होता. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ होत होती. डॉ. गुप्ते यांच्या गाडीचीही
नासघूस झाली होती. चाकूसुऱ्यांचा सर्रास वापर करण्यात येत होता. शेवटी गोळीबार
करून दंगल आटोक्यात आणली गेली. त्या वेळेस सतत तीन दिवस मी झोपलोसुद्धा नव्हतो.
Subscribe to:
Posts (Atom)
