Showing posts with label मराठा. Show all posts
Showing posts with label मराठा. Show all posts

Thursday, August 14, 2014

मराठा सैनिक


शिवसेनेने 1969 मध्ये दाक्षिणात्यांविरुद्ध जोरदार आंदोलन सुरू केलं होतं. उठाव लुंगी बजाव पुंगी अशी घोषणा दिली होती. डॉ. हेमचंद्र गुप्ते, मनोहर जोशी आदी मध्य मुंबईतले नेते त्या काळी सर्व भागात फिरत होते. जमाव पिसाटला होता. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ होत होती. डॉ. गुप्ते यांच्या गाडीचीही नासघूस झाली होती. चाकूसुऱ्यांचा सर्रास वापर करण्यात येत होता. शेवटी गोळीबार करून दंगल आटोक्यात आणली गेली. त्या वेळेस सतत तीन दिवस मी झोपलोसुद्धा नव्हतो.